Lok Sabha Elections 2024 | आगामी निवडणुकीसाठी आढळराव पाटील अजित पवार गटासोबत जाणार? शिरूर मतदारसंघात चर्चा

पुणे : शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अनेक मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) राजकीय समिकरणे जुळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या आहेत. याच पाश्र्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढवू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव पाटील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सोबत गेले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency) आढळराव पाटील तीन वेळा निवडूण आले आहेत. याच मतदार संघावर सध्या भाजपाने देखील दावा केला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) येथून लढण्याच्या तयारीला लागले आहेत.

तर, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) शरद पवार गटातच (Sharad Pawar Group) राहिले आहेत. या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha Elections 2024) महायुतीच्या जागावाटपात अजित पवार या जागेवर दावा करू शकतात. त्यामुळे कोल्हे यांच्याविरोधात लढण्यासाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही विचार करू शकतात, अशा शक्यता काही मराठी वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केली होती.

परंतु, अशी चर्चा सुरू झाल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सावध पवित्रा घेत,
या चर्चेवर मी आताच काही प्रतिक्रिया देणार नाही असे म्हटले आहे.

भाजपा-शिवसेना युतीचे वर्चस्व असताना शिरूर मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडूण गेले होते.
त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने येथे सुरूंग लावत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे विजयी झाले.
परंतु या पराभवानंतर पाच वर्षांत आढळराव पाटील यांनी मतदारसंघात आपली ताकद वाढवली आहे.
त्यामुळे आगामी निवडणूक अमोल कोल्हे यांच्यासाठी सुद्धा सोपी असणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्या आजोबांना…