हेमा मालिनी लोकसभेतील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ६व्या स्थानी ; जाणून घ्या सर्वात ‘श्रीमंत’ Top 10 खासदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून एनडीएने सर्वाधीक जागा जिंकून दुस-यांदा सरकार स्थापन करणार आहे. लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उमेदवारांनी जाहीर केलेल्या संपत्तीबाबतची माहिती समोर आली आहे. १७ लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांपैकी काही खासदार अति श्रीमंत आहेत तर काही गरीब आहेत.

लोकसभेतील अति श्रीमंत खासदार…
१) नकुल नाथ – मध्य प्रदेशमधील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुल नाथ हे निवडून आले आहेत. त्यांच्याकडे ६१८ कोटींची चल तर ४१७ कोटींची अचल संपत्ती आहे. नकुल नाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांचे चिरंजीव आहेत.
२) वसंतकुमार एच – वसंतकुमार एच यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांच्याकडे २१० कोटींची चल तर १८७ कोटींची अचल संपत्ती आहे.
३) डीके सुरेश – यांनी काँग्रेसकडून बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. डीके सुरेश यांच्याकडे ३३ कोटींची चल तर ३०५ कोटींची अचल संपत्ती आहे.
४) केआरआरके राजू – आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर पक्षाकडून नरसापूरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्याकडे १९८ कोटींची चल तर १२७ कोटींची अचल संपत्ती आहे.
५) जयदेव गल्ला – टीडीपीच्या तिकीटावर निवडून आलेले जयदेव गल्ला हे आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्याकडे १६७ कोटींची चल तर १३७ कोटींची अचल संपत्ती आहे.
६) हेमा मालिनी – अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी यांनी भाजपाकडून यंदाची निवडणूक लढवली आहे. त्यांच्याकडे २५.५ कोटींची चल तर २२४ कोटींची अचल संपत्ती आहे.
७) मलूक नगर – उत्तर प्रदेशातील बिजनौर मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्याकडे ११५ कोटींची चल तर १३४ कोटींची अचल संपत्ती आहे.
८) अडाला पी. रेड्डी – नेल्लोर लोकसभा मतदारसंघातून रेड्डी यांनी निवडणूक लढवली. वायएसआर पक्षाच्या तिकीटावर ते निवडून आले आहेत. त्यांच्या नावावर ९५ कोटींची चल तर १२५ कोटींची अचल संपत्ती आहे.
९) सुखबीर सिंह बादल – पंजाबच्या फिरोजपूर येथून अकाली दलाच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली आहे. सुखबीर सिंह बादल यांच्या नावावर १०० कोटींची चल तर ११७ कोटींची अचल संपत्ती आहे.
१० ) हरसिमरत कौर बादल – पंजाबच्या बठिंडा लोकसभा मतदारसंघातून अकाली दलाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे. त्यांच्याकडे फिरोजपूरचे खासदार सुखबीर सिंह बादल यांच्या प्रमाणेच संपत्ती आहे. बादल यांच्या नावावर १०० कोटींची चल तर ११७ कोटींची अचल संपत्ती आहे.