ब्रेकिंग : भाजपकडून पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गडकरींसह 182 जणांच्या उमेदवारीची घोषणा

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन- लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर काही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर केलेल्या आहेत. सत्‍ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहिर झालेली नव्हती. शेवटी आज (गुरूवार) भाजपकडून पहिली यादी जाहिर करण्यात आली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह 182 उमेदवारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी आणि राजनाथ सिंह हे लखनौ लोकसभा मतदार संघातुन तर नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढणार आहेत. डॉ. सत्यपाल सिंह हे बागपत येथून लोकसभा निवडणुक लढवणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1108730778530340865

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us