प्रशांत किशोर यांनी शिवसैनिकांची आखली युद्धनीती

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सध्या सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज प्रशांत किशोर यांनी शिवसैनिकांची बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले आहे. नाशिक, शिरूर, ठाणे, रायगड या चार मतदारसंघातील शिवसैनिकांची आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर पार पडली आहे.

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांना रणनीती आखून देण्याचे काम सध्या प्रशांत किशोर करत आहेत. या आधी हि त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती झाली नव्हती म्हणून प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला युती करण्यासाठी विनंती देखील केली होती.

आज पुन्हा प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर येऊन येथील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्याच प्रमाणे आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काय रणनीती असणार आहे या बद्दल त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे.नाशिक, शिरूर, ठाणे, रायगड  या शिवसेनेच्या कोठ्यातील लोकसभा जागांसाठी प्रशांत किशोर यांनी आज मातोश्रीवर रणनीती निश्चित केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us