गरज पडल्यास नारायण राणे शरद पवारांचे पाय धरतील : विनायक राऊत 

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांची आगपाखड चांगलीच सुरु झाली आहे. अशातच सिंधुदुर्ग रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. गरज पडली तर नारायण राणे हे शरद पवारांचे पाय देखील धरतील असे खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लोकसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली असताना हाच धागा पकडून विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे यांनी कित्येकदा शिवसेना पक्ष प्रमुखांना शिवसेनेत सामील होण्याची मागणी पत्र लिहून केली. मात्र शिवसेना पक्ष प्रमुखांनी त्यांना प्रत्येक वेळी नकार दिला असा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला आहे.

काँग्रेसमध्ये जाऊन राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यानंतर भाजपच्या जवळ जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुलाला उभा करण्याचा खटाटोप त्यांनी सुरु केला आहे. गरज पडली तर नारायण राणे हे शरद पवारांचे पाय देखील धरतील असे विनायक राऊत म्हणले आहेत. सेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांचीच पुन्हा घोषणा होण्याची शक्यता आहे. तर राणे यांचे पुत्र स्वाभिमानी पक्षाचे अथवा राष्ट्रवादीचे उमेदवार होण्याची शक्यता आहे.

ह्याही बातम्या वाचा –

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !