‘या’ मतदारसंघातून राहुल गांधी पिछाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी हे अमेठी आणि वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर वायनाडमधून आघाडी घेतली आहे. अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.

याच मतदार संघात राहुल गांधी पिछाडीवर आहेत. वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी घेतली आहे. तसेच सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या भोपाळ मतदारसंघातून भाजपाच्या साध्वी प्रज्ञा या पिछाडीवर आहे. सुशिलकुमार शिंदे पिछाडीवर आहेत.

लखनऊ मध्ये राजनाथ सिंह यांनी पहिल्या तासातच आघाडी घेतली आहे.राज्यात मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार, उस्मानाबाद ओमराजे, शिरूर अमोल कोल्हे, नगर सुजय विखे, बारामती सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती –
भाजपा – २२
शिवसेना – ११
काँग्रेस – ५
राष्ट्रवादी – १०
इतर -१