ज्योतिरादित्य शिंदे पराभवाच्या छायेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मध्यप्रदेशातील हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या गुना लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई झाली. मात्र शिंदे घराच्या कॉंंग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे हे येथे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आता ६०५०० मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपचे के. पी. यादव आघाडीवर आहेत.

गुना मतदारसंघ शिंदे परिवाराचा गड समजला जातो. याआधी येथे ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे त्यानंतर माधवराव शिंदे आणि आता ज्य़ोतिरादित्य शिंदे येथून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या के. पी. यादव यांचे तगडे आव्हान आहे. तर सपा-बसपाकडून लोकेश सिंह राजपूत आपले नशीब आजमावत आहेत. येथे ज्योतिरादित्य शिंदे यांना मागे टाकत के. पी. यादव यांनी ६० हजार मतांनी आघाडी घेतली आहे.