Love Jihad Case | शाहरुखच्या मुलाची चिंता करणाऱ्या ताई पीडित मुलींची भेट घेणार का?, नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मुंढवा भागात राहणाऱ्या तरुणीसोबत लव्ह जिहादची (Love Jihad Case) घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. भाजपचे नेते आमदार नितेश राणे (BJP Leader MLA Nitesh Rane) यांच्या नेतृत्वात लव जिहाद (Love Jihad Case) विरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला. मी त्या ताईंना एक विचारु इच्छितो की, ताई तुला शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलाची चिंता आहे, या पीडित मुलींची चिंता करुन भेट घेणार का? असा प्रश्न नितेश राणेंनी केला आहे.

 

 

सकल हिंदू समाजाने लव जिहाद विरोधात (Love Jihad Case) मुंढवा (Mundhwa) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Raje Chowk) ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान मोर्चा काढत निषेध नोंदविला. हिंदू मुलींचा जीव घेणाऱ्या नराधम जिहादीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केली आहे.

मोर्चा नंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदू मुलीचे धर्मांतर (Conversion of Hindu Girl) होत नाही. अन्याय अत्याचार होत नाही. तिहेरी तलाक (Triple Talaq) राहिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका राज्यातील काही नेते मंडळी करीत आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर निशाणा साधला. तसेच या लव जिहाद प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचे काम काही पोलीस अधिकारी (Pune Police) करित आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राणे म्हणाले.

 

केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हिंदूंवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही,
यासंदर्भात सरकार निश्चित काळजी घेत आहे. या सर्व घटना लक्षात घेऊन लव जिहाद विरोधात राज्य सरकार (State Government)
कायदा करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

 

 

Web Title :  Love Jihad Case | nitesh rane criticise supriya sule over love jihad case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा