आजपासून सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले, जाणून घ्या

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन- घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीचे नियम बदलले आहेत. आजपासून होम डिलिव्हरीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार (lpg-cylinder-new-rules-need-share-otp-home-delivery-today) आहेत. सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी कंपन्या डिलिव्हरी सिस्टिम लागू केली आहे. ही सिस्टिम नेमकी कशी आहे, जाणून घ्या..

या नव्या सिस्टिमला DAC असं नाव दिले आहे. त्याचा अर्थ डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असा होता. त्यामुळे आता केवळ बुकिंगाच्या आधारावर सिलिंडरची घरापर्यंत डिलिव्हरी केली जाणार नाही. तर त्यासोबत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक कोड पाठवण्यात येईल. तुम्ही गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत हा कोड दाखवत नाही, तोपर्यंत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही.

एखाद्या ग्राहकानं वितरकाकडे त्याचा मोबाईल नंबर अपडेट केला नसल्यास गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडे असलेल्या ऍपच्या मदतीनं रियल टाईम नंबर अपडेट करता येईल. त्यानंतर कोड जनरेट करता येईल. नवी यंत्रणा लागू झाल्यावर चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेल्या ग्राहकांच्या अडचणी वाढतील. त्यांच्या घरी होणारी सिलेंडरची डिलिव्हरी रोखली जाऊ शकते.
तेल कंपन्या सर्वप्रथम नवी यंत्रणा 100 स्मार्ट सिटीमध्ये लागू करणार आहेत. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही यंत्रणा लागू होईल. जयपूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा लागू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर लागू केलेल्या यंत्रणेला 95 टक्क्यांहून अधिक यश मिळाल आहे. ही योजना घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरसाठी असेल. व्यवसायिक वापरासाठीच्या सिलेंडरसाठी ही योजना लागू होणार नाही.