LPG Cylinder Subsidy | तुम्हाला एलपीजी सबसिडी मिळत नाहीये? मग करा ‘हे’ काम; त्वरीत जमा होतील पैसे; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Cylinder Subsidy | एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ग्राहकांनी एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder Subsidy) खरेदी केला असाल आणि तुम्हाला सरकारकडून सबसिडी येत नसेल. तर प्रथमता तुम्हाला सबसिडी मिळत आहे वा नाही? हे चेक करणे महत्वाचे आहे. आधीच सिलेंडरची किंमत्या वाढल्या आहेत. त्यातच सबसिडी मिळाली नाही तर सामान्य अधिक नुकसानीत जाताना दिसतात. त्यामुळे या सबसिडीची नेमकी प्रक्रिया काय आहे. याबाबत जाणून घ्या.

या प्रक्रिया ग्राहकाला घर बसल्या करता येणार आहेत. एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder Subsidy) सबसिडी तुमच्या खात्यात जात आहे की नाही. याबाबत माहिती जाणून घ्या.

सर्वप्रथम www.mylpg.in वेबसाइटला भेट द्या.

यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला 3 कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.

तुमचा सेवा पुरवठादार काहीही असो गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.

यानंतर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची माहिती असेल.

वर उजव्या बाजूला साइन-इन आणि नवीन वापरकर्त्याचा पर्याय असेल, तो निवडा.

जर तुमचा ID आधीच तयार झाला असेल, तर तुम्हाला साइन इन करावे लागेल.

जर आयडी नसेल तर तुम्हाला नवीन यूजर निवडावा लागेल.

यानंतर, उघडणाऱ्या विंडोमध्ये उजव्या बाजूला व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीचा पर्याय असेल, तो निवडा.

तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तुम्हाला तेथे कळेल.

सबसिडी न मिळाल्यास तुम्ही 18002333555 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

दरम्यान, सरकार अनेक नागरीकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी देत नाही. याचं मुळ कारण म्हणजे ग्राहकाचे आधार लिंक नसलेले असू शकते. त्याचबरोबर ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये अथवा त्याहून जास्त आहे. अशांना सबसिडी मिळत नाही. विशेष म्हणजे, तुमचे स्वत:चे उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी तुमची पत्नी, पती या दोघांचे मिळून उत्पन्न दहा लाख अथवा त्याहून जास्त असेल तरही सबसिडी मिळणार नाही. दरम्यान, आधी 200 रुपयांपर्यंतचे अनुदान सिलिंडरवर उपलब्ध होते. तो आता कोरोना काळात केवळ 10-12 रुपये सबसिडी म्हणून येत आहेत.

Web Title :- LPG Cylinder Subsidy | lpg subsidy latest news how to check lpg cylinder subsidy in account here is the process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Buldhana Crime | मोबाईलवर गेम खेळण्यास आई-वडिलांनी केला विरोध; 16 वर्षीय मुलानं थेट केलं हे ‘कृत्य’

Mira Bhayandar Crime | मिरा भाईंदर मनपातील अभियंत्याच्या कारवर गोळीबार, परिसरात खळबळ

Viral Letter | दोन बालकांनी पीएम मोदी आणि सीएमला लिहिले ‘हे’ क्यूट पत्र, सांगितल्या आपल्या अडचणी