1 डिसेंबर : LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशभरात वाढत्या महागाईच्या दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत डिसेंबरमध्ये सुद्धा दिलासा दिला आहे. 1 डिसेंबर 2020 ला सुद्धा घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सुद्धा एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. मात्र, 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 55 रुपयांची वाढ झाली आहे.

शेवटचे जुलैमध्ये वाढले होते घरगुती गॅसचे दर
यापूर्वी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडच्या दरात जुलै 2020 ला 4 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर, यापूर्वी जूनच्या दरम्यान दिल्लीत 14.2 किलोग्रॅमचा विना अनुदानित एलपीजी सिलेंडर 11.50 रुपयांनी महागला होता, तर मे महिन्यात 162.50 रुपयांनी स्वस्त झाला होता.

चेक करा नवी दर
देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीच्या वेबससाइटवर देण्यात आलेल्या दरानुसार दिल्लीत सिलेंडरच्या किमती स्थित आहेत. दिल्लीत सध्या 14.2 किलोचा सबसिडीवाला गॅस सिलेंडर 594 रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत सुद्धा सबसिडीवाल्या सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे, परंतु चेन्नईत ही किंमत 610 रुपये प्रति सिलेंडर आहे आणि कोलकातामध्ये 14.2 किलोच्या या सिलेंडरची किंमत 620 रुपये आहे.

कमर्शियल सिलेंडरच्या दरात वाढ
डिसेंबर महिन्यासाठी 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत सर्वात जास्त 56 रुपये प्रति सिलेंडर वाढ झाली आहे. आता येथे एका कमर्शियल सिलेंडरसाठी 1410 रुपये द्यावे लागतील. याशिवाय देशाची राजधानी दिल्लीत 55 रुपयांची वाढ झाली आहे. येथे या सिलेंडचा रेट 1296 रुपये आहे. कोलकाता आणि मुंबईत सुद्धा 55 रुपयांची वाढ दिसत आहे, ज्यानंतर या दोन्ही शहरात नवे दर अनुक्रमे 1351 आणि 1244 रुपये झाले आहेत.

You might also like