LPG Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; 25 रुपये द्यावे लागणार जादा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Gas Cylinder Price | गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या इंधन दरवाढीने सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने लोकांना दरवाढीचा मोठा झटका बसला आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत 25 रुपयांची वाढ (LPG Gas Cylinder Price) केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे.

दिल्लीतील घरगुती गॅस सिलिंडरच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर 859.5 रुपये झाला आहे. याआधी दिल्लीमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 834 रुपये इतकी होती. मुंबईत गेल्या महिन्यात गॅसची किंमत 834.5 रुपये इतकी होती. आता यामध्ये 25 रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत गॅस 859.5 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्येही 14 किलोच्या घरगुती गॅसची किंमत 886 रुपये इतकी झाली आहे.

याआधी कोलकातामध्ये गॅस सिलिंडर 861 रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये 875.5 तर लखनऊमध्ये 897.5 रुपयांना 14 किलोचा गॅस मिळेल. याचबरोबर 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर 1618 रुपये झाला आहे. इधंन दरवाढीबरोबरच घरगुती सिलेंडरच्या किमतीही सातत्याने वाढत होत्या. जानेवारी 2021 मध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये प्रति सिलिंडर होती. त्यानंतर हि किंमत 1 मार्च 2021 पर्यंत 819 वर पोहचली होती. या किमतीत एप्रिलमध्ये 10 रुपयांची कपात करण्यात आल्याने मे महिन्यात सिलिंडरचा दर 810 रुपये झाला होता. तर जून महिन्यात कंपन्यांनी दरात कोणताही बदल केला नाही.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर चाकूने वार करुन केले जखमी

Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

PM Kisan | चुकीच्या पद्धतीने हप्ता घेणार्‍यांवर सरकारची कारवाई, राज्यांनी सुरू केली वसूली प्रक्रिया

Baramati News | बारामतीतील दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LPG Gas Cylinder Price | LPG Gas Cylinder Price Increased 25 rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update