महिलेनं मंगळसूत्र हिसकावणार्‍याचा अंगठ्याचा दातांनी चक्क तुकडाच पाडला, जीव वाचवून पळाला चोरटा

लखनऊ : वृत्तसंस्था – एका चोरट्याला महिलेचे मंगळसूत्र हिसकावणे खुप महागात पडले. महिलेने त्याचा अंगठा चावून तो वेगळा केला. जखमी चोर जीव वाचवण्यासाठी पळून गेला. सीतापुरच्या तंबौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना बुधवारी सकाळी गावाच्या बाहेर घडली. ही महिला शौचासाठी गेली होती, तेव्हा चोरट्याने तिच्यावर हल्ला केला.

जखमी चोर जीव वाचवण्यासाठी पळून गेला. परंतु तो मंगळसूत्र घेऊन पळाला. त्याचा तुटलेला अंगठा घटनास्थळावर पडला होता. पोलिसांनी रक्ताच्या डागांवरून खुप दूरपर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडू शकला नाही. लवकरच या घटनेचा शोध लावला जाईल, असा दावा पोलीसांनी केला आहे. बसंतापुर गावातील रहिवाशी विक्रम यादव यांची पत्नी रामादेवी बुधवारी सकाळी शौचासाठी बाहेर गेली होती. तेथून ती गावाकडे परत येत असताना सायकलवरून आलेल्या चोरट्याने तिचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. या महिलेने त्याला त्याला प्रतिकार केला.

चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र आणि कानातील रिंग खेचली. यावेळी महिलेने चोरट्याचा अंगठा तोंडात पकडला आणि दाताखाली तो करकचून चावला, यामुळे अंगठा तुटून खाली पडला.

अंगठ्यातून येणार रक्त आणि महिलेचा प्रतिकार पाहून चोरटा पळून गेला आणि त्याचा तुटलेला अंगठा आणि मफलर घटनास्थळावरच पडला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांचे म्हणाले की, आरोपीच्या तुटलेल्या अंगठ्यातून रक्त पडत असल्याने त्या मागावर आम्ही शोध घेतला परंतु तो सापडू शकला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याला लवकरच पकडले जाईल.

You might also like