UP : बसपाचे माजी महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी आणि राम अचल राजभर यांना अटक, कारागृहात पाठवले

लखनऊ : वृत्तसंस्था – भाजपा नेते दयाशंकर सिंह यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलींवरील वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात मंगळवारी बसपाचे माजी महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी (Nasimuddin Siddiqui) आणि राम अचल राजभर (Ram Achal Rajbhar) यांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. दोन्ही नेत्यांनी एमपी-एमएलए कोर्टात सरेंडर केले. जिथे कोर्टाने दोन्ही नेत्यांना जेलमध्ये पाठवले. दोन्ही नेत्यांनी सरेंडरसह अंतरिम जामीनासाठी अर्ज सुद्धा दिला होता. कोर्टाने सुनावणीनंतर अंतरिम जामीन फेटाळत त्यांना जेलमध्ये पाठवले. यापूर्वी दोन्ही नेत्यांना कोर्टाने फरार घोषीत करून त्यांची संपत्ती गोठवण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने या प्रकरणात इन्स्पेक्टर हजरतगंज यांना 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाईचा अहवाल देण्याचा आदेश दिला होता.

बसपाचे तत्कालीन राष्ट्रीय सचिव मेवालाल गौतम, अतरसिंह राव, नौशाद अली सुद्धा या प्रकरणात आरोपी आहेत. 12 जानेवारीला सर्व आरोपींच्या विरोधात 508, 509,153अ, 34, 149 आणि पॉक्सो अ‍ॅक्टअंतर्गत चार्जशीट दाखल झाले होते. बसपा सुप्रीमोंच्या विरोधात भाजपा नेत्यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संतापलेल्या बसपा नेत्यांनी लखनऊमध्ये प्रत्युत्तर दिले होते. संतापलेल्या या बसपा नेत्यांनी दयाशंकर यांच्या पत्नी स्वाती सिंह, आई तेतरी देवी आणि अल्पवयीन मुलीबाबत अक्षेपार्ह टिपण्णी केली होती. या प्रकरणात 22 जुलै 2016 ला दयाशंकर सिंह यांच्या आई तेतरी देवी यांनी हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती.

हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल या प्रकरणात नसीमुद्दीन सिद्दीकी आणि राम अचल राजभर यांनाही हजर व्हायचे होते. परंतु वॉरंट जारी होणे आणि फरारी घोषीत झाल्यानंतर सुद्धा दोघेही कोर्टात हजर झाले नाही आणि गैरहजर राहण्याची परवानगी आणि तारीख वाढवण्याचा अर्ज दिला. यावर कोर्टाने म्हटले की, हा अर्ज योग्य नाही. तर अन्य तीन आरोपी मेवालाल गौतम, अतर सिंह राव, नौशाद अली कोर्टात हजर झाले होते.