समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंहांची ‘या’ कारणामुळे प्रकृती खलावली ; हॉस्पिटलच्या ‘ICU’ मध्ये दाखल

लखनऊ : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची आज अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्याने मुलायम सिंह यादव यांना लखनऊ येथील लोहिया इंस्टीट्यूटमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार करणारे डॉ. भुवन चन्द्र तिवारींनी सांगितले, मुलायम सिंह यादव यांना शुगरचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना हॉस्पिटमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. मुलायम सिंह हायपर ग्लाइसेमिया (हायपर टेन्शन) आणि हायपर डायबिटीजने त्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर लोहिया इंस्टीट्यूटमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मुलायम सिंह यादव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रुग्णालयात जाऊन मुलायम सिंह यांची विचारपूस केली. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय ; जुन्या आजारामुळे विम्याचा दावा नाकारता येणार नाही

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी