CAA आणि PM मोदींना माझं पूर्ण ‘समर्थन’, मुलायम सिंहांच्या ‘धाकट्या’ सूनबाईंनी सांगितलं

लखनऊ : वृत्तसंस्था – मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी राजकारणातील सर्वात ज्वलंत विषयावर म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपलं मत मांडलं. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपलं मत मांडताना म्हटलं की, सीएए नवीन नाही. हे राष्ट्र आणि प्रजासत्ताक मजबूत करेल. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अपर्ण यादव म्हणाल्या, “मी समाजवादी आहे. परंतु मोदी सरकार सर्वांचे आहेत. माझं सीएए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्णपणे समर्थन आहे.” भाजप जॉईन करण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “मी कधीच भाजपमध्ये जाण्याबद्दल बोलले नाही.”

मोदी सरकारच्या धोरणांचं खुलं समर्थन करण्याची अपर्णा यादव यांची काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अपर्णा यांनी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांचं समर्थन करत त्यांची स्तुती केली आहे. सीएए आणि अनआरसी या मुद्द्यांवर अपर्णा यादव आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचं मत वेगवेगळं आहे.

काही दिवसांपूर्वी अपर्णा यादव यांनी या मुद्द्यावर ट्विट करत म्हटलं होतं की, जे भारताचे आहेत त्यांना रजिस्टरमध्ये नोंद करण्यास काय अडचण आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी जामिया मिलाया इस्लामिया युनिव्हर्सिटी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, आणि 16 डिसेंबरच्या हॅशटॅगचा वापर केला होता. त्यांनी सीएए आणि एनआरसीला होणाऱ्या विरोधाबद्दलही सवाल उपस्थित केले होते.

फेसबुक पेज लाईक करा –