Madha Lok Sabha Election 2024 | माढा लोकसभा मतदारसंघातून पुण्याचे प्रवीण गायकवाड?

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – Madha Lok Sabha Election 2024 | मोहिते पाटील यांचे माढा लोकसभा मतदारसंघात मोठे काम आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) लढावे ही आमची इच्छा आहे. मात्र, ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवली आहे , असे संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी म्हटले आहे.

गायकवाड मूळचे पुण्यातील मुंढवा (Mundhwa) येथील असले तरी त्यांची माळशिरस (Malshiras) तालुक्यात शेती, घर आहे. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी मोठी चळवळ सुरु केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माढा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. रविवारी पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबत झाले. गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे माढा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी ५ वर्षांपूर्वी पुण्यातून काॅंग्रेसतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.(Madha Lok Sabha Election 2024)

भाजपने नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.
मात्र, या उमेदवारीला विरोध करत अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी बंडाचे हत्यार उपसले.
यातूनच मोहिते-पाट पवार गटाशी जवळीक साधत होते. निवडणुकीसाठी तयारीही त्यांनी चालविली होती.

हे समजल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचे मतपरिवर्तन केले. त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली. स्वत: गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शविली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?

Maharashtra Sadan Scam | महायुतीला धक्का! अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत? उद्यापासून सुरू होणार ‘या’ प्रकरणाची सुनावणी