Madhuri Shirole Passed Away | पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या पत्नी माधुरी शिरोळे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Madhuri Shirole Passed Away | पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे (Former Pune MP Anil Shirole) यांच्या पत्नी माधुरी अनिल शिरोळे यांचे आज (बुधवार, दि.20) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती अनिल शिरोळे, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (Madhuri Shirole Passed Away)

मागील दोन महिन्यापासून त्या दीर्घआजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी 10.17 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. (Madhuri Shirole Passed Away)

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), हॉटेल व्यवसायिक संग्राम शिरोळे हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचे पार्थिव दुपारी दोन ते चार पर्य़ंत त्यांच्या घोल रोडवरील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. चार वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून साडे चार वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikunth Smashan Bhoomi) त्यांच्यावर अंत्यविधी केले जाणार आहेत, अशी माहिती शिरोळे कुटुंबियांनी दिली.

भारतीय जनता पार्टी (BJP) कसबा विधानसभा मतदार संघाच्या (Kasba Assembly Constituency) वतीने माधुरी शिरोळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या नेत्यानं उचललं टोकाच पाऊल, रेल्वेखाली येत संपवलं जीवन

Side Effects Of Raisins | सावधान..जास्त मनुका खाल्ल्याने होऊ शकतो डिहायड्रेशन आणि श्वसनाचा त्रास…

Pune PMC News | खड्डेमुक्त जंगली महाराज रस्त्याच्या मेन्टेनन्ससाठी 2 कोटी रुपयांची निविदा

Benefits Of Ginger Water | रिकाम्या पोटी 1 ग्लास आल्याचे पाणी सेवन केल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारी फायदे…

Waxing At Home | घरी वॅक्सिंग करताना करू नका ‘या’ 5 चुका, नाहीतर तुमची त्वचा होऊ शकते खराब

Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग