COVID-19 ला हरवण्यासाठी खास ‘डाएट प्लॅन’, बाधित पोलीस ‘कोरोना’मुक्त झाल्याचा दावा

इंदोर : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून अद्याप या विषाणूवर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांवर विविध औषधांचं ट्रायल सुरु आहे. यापैकी काही औषधं प्रभावी ठरत असल्याचंही दिसून आलं आहे. मात्र आता कोरोनाला हरवण्यासाठी एक खास डाएट प्लॅन तयार करण्यात आला असून यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचा दावा करण्यात आला आहे.

इंदोरचे पोलीस महानिरीक्षक हरीनारायणचारी मिश्र यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी हा खास डाएट प्लॅन तयार केला आहे. व्हिएतनाम, कंपोडियामध्ये अशा डाएट प्लॅनमुळे कोरोना रुग्ण बरे झालेत. जेव्हा इंदोरमधील एका पोलीस जवानावर याचा प्रयोग करण्यात आला, तेव्हा त्याचा परिणाम चांगला दिसून आला आहे, अशी माहिती हरीनारायणचारी मिश्र यांनी दिली.
डीआयजी हरीनारायणचारी मिश्र यांनी सांगितले, एका पोलीस जवानाला ताप आला होता. तेव्हा त्याला नारळपाणी, व्हटॅमिन सी असलेले ज्यूस, मोसंबी फळं, आंबट फळं, गाजरांचा ज्यूस देण्यात आला. त्याचा ताप दोन दिवसांत बरा झाला. जवानाला होम क्वारंटाईन केल्यानंतर त्याच्यावर हा प्रयोग करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा आहार घेतल्यानंतर चार दिवसात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

अशाच पद्धतीचा आहार इतर कोरोनाग्रस्त 45 पोलीस कर्मचाऱ्यांनाही देण्यात आला. ते देखील बरे झाले. त्यानंतर गेल्या दीड महिन्यात एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे डीआयजी मिश्र यांनी सांगितले.

कसा आहे डाएट प्लॅन
पहिल्या दिवशी व्हिटॅमिन सी असलेले ज्युस म्हणजे लिंबूपाणी, संत्री-मोसंबी ज्युस आणि नारळपाणी देण्यात आलं. दुसऱ्या दिवशी गाजर, काकडी, अंडं, दूध, दिवसा चहा आणि गरम पाण्यातील काढा दिला जातो. तिसऱ्या दिवशी प्रोटिनयुक्त पदार्थ जसं की ड्रायफ्रुट्स, बिया, बटाट, भात आणि फळं दिली. अशाच पद्धतीने दररोज आहार देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.