मी ज्योतिरादित्य शिंदेचा ‘चमचा’, त्यात गैर काय ?, ‘या’ काँग्रेस मंत्र्याची कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील एका मंत्र्याने स्वत:ला ज्योतिरादित्य शिंदे यांचा आपण चमचा असल्याचे म्हणले आहे. ही अजब कबुली मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया यांनी दिली आहे. ते म्हणाले की, हो, मी महाराज ज्योतिरादित्य शिंदे यांचा चमचा आहे आणि आयुष्यभर त्यांचा चमचा राहील. यात गैर काय ? चमचा असल्याचा मला अभिमान आहे.

महेंद्र सिंह हे विधान करुन थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की कालपर्यंत खासदार के. पी. यादव (गुनाचे भाजप खासदार) हे ज्योतिरादित्य यांचे चमचे नव्हते का ? ते महाराज्यांच्या गाडीमागे धावत नव्हते का त्यात गैर काय ? महाराज्यांनी मला तिकीट दिले. माझे आयुष्य घडवले. मला कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे मी त्यांचा चमचा आहे.

भाजप खासदारांनी सिसोदिया यांना चमचा म्हणले होते. त्याला प्रत्युत्तर देताना सिसोदिया यांनी हे विधान केले. भाजप खासदारांनी तुम्हाला ज्योतिरादित्य शिंदे यांचा गुलाम म्हणले होते. असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, मला गुलाम नव्हे तर चमचा संबोधले आहे, त्यामुळे त्यात काही गैर नाही. उलट माझे भाग्य आहे की मी त्यांचा चमचा आहे. मला तर वाटतेय की तुम्ही मला कढाई देखील बोला. चमचा, कढाई दोन्ही बोला. मी चमचा आहे, त्यात लपवण्यासारखे काय आहे. मी आयुष्यभर त्यांचा चमचा राहिलं. मी राजकारण सोडेल पण महाराजांना सोडणार नाही.

खासदार के. पी. यादव यांच्या वडिलांचे निधान झाल्यानंतर त्यांचे सांत्वन करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे हे 17 जानेवारीला यादव यांच्या घरी जाणार होते. परंतु त्याआधीच के पी यादव यांनी जनआक्रोश रॅलीत वादग्रस्त विधान केल्याने शिंदेचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like