काँग्रेस शासित MP मध्ये 10 वी बोर्डाच्या परिक्षेत पेपरमध्ये गंभीर चूक, POK चा उल्लेख ‘आझाद काश्मीर’ म्हणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश राज्य बोर्डाच्या 10 वीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या परिक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता ज्यात पाक व्याप्त काश्मीरला (PoK) आझाद काश्मीर म्हणण्यात आलं आहे.

आझाद काश्मीर या शब्दाचा उपयोग पाकिस्तान द्वारे त्यांच्या ताब्यातील काश्मीरसाठी केला जातो. काश्मीरच्या ज्या भागावर पाकिस्तानचा कब्जा आहे, भारत त्याला पाक व्याप्त काश्मीर म्हणतो. भारताकडून तर अनेकदा सांगण्यात आले आहे की पीओकेसह संपूर्ण काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे.

यावरुन आता मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होऊ लागला आहे. एका ट्विटर यूजरने लिहिले की काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. त्यांच्यासाठी जम्मू काश्मीर भारतात थोडीच आहे. एकाने लिहिले की या कारणाने शिक्षणात सुधार होण्याची आवश्यकता आहे. एकाने लिहिले की गुन्हा दाखल केला गेला पाहिजे.

एका यूजरने लिहिले की मध्य प्रदेशच्या न्यायालयाने यावर बोलले पाहिजे. हे सीएए – एनआरसी पेक्षा भयंकर आहे. एका यूजरने लिहिले की ही फक्त एक चूक नाही, तर मुद्दाम, विचारपूर्वक केलेली चूक आहे. हा देशांतील सैनिकांचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचा अपमान आहे.