जिल्ह्यातील चुरस वाढली, दुपारपर्यंत 49 टक्के मतदान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान झाले. जामखेड येथील वादाची घटना वगळता इतरत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र अपेक्षेपेक्षा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जास्तच चुरस जाणवली.

कोपरगाव ४७ टक्के, नेवासा ५७ टक्के, अकोले ४९, संगमनेर ५२, शिर्डी ४९, श्रीरामपूर ४२, शेवगाव ४५, राहुरी ४८, पारनेर ४८, अहमदनगर ३८, श्रीगोंदा ४४, कर्जत-जामखेड ५१ टक्के मतदान झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. काही प्रस्थापितांना धक्का बसू शकतो, असेही सांगितले जात आहे. कुठलाही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

Visit  :Policenama.com