PM मोदी काय डोनाल्ड ट्रम्प आले तरी विजय माझाच, ‘या’ उमेदवाराचे ‘टशन’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा समाना असला तरी खरा सामना मुंडे विरुद्ध मुंडे असाच रंगणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही उमेदवार आपणच विजयी होणार असल्याचा दावा करत आहे. धनंजय मुंडे यांनी आज परळीतील घाटनांदूर येथे प्रचार सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी विजय माझाच असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

परळीमध्ये बंधू विरुद्ध भगिनी अशी लढत होत आहे. या निवडणूक प्रचारात ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना एकही संधी सोडत नाहीत. महिला व बालकल्याण मंत्री तथा ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी 17 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यावर टीका करताना धनंजय मुंडे यांनी डोनाल्ड ट्रम जरी परळीत सभेला आले तरी माझाच विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.

परळी विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जी रॅली पाहिली त्याचा धसका घेतला म्हणून बड्या नेत्यांना प्रचारासाठी घेऊन येत आहेत, असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला. परळीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दोन्ही पक्षाकडून आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. याच प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवार एकमेकांवर टीका, आरोप करताना दिसत आहेत.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी