इंदापूरात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांचेसह १५ उमेदवार रिंगणात

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आप्पासाहेब जगदाळे यांनी माघार घेत भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. इंदापूरातून एकूण तीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शेवटच्या दिवशी पंधरा जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने सध्या निवडणूक रिंगणामध्ये पंधरा उमेदवार आहेत यामध्ये भाजपकडून हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादी कडून दत्तात्रय भरणे यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे.

दत्तात्रय विठोबा भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), हर्षवर्धन शहाजीराव पाटील (भारतीय जनता पार्टी), ॲड. सचिन भास्कर जोरे (वंचित बहुजन आघाडी), कांतीलाल हनुमंत ठोकळे (बहुजन समाज पार्टी), सविता भीमराव कडाळे (हिंदुस्तान जनता पार्टी), ॲड. गिरिष मदन पाटील (अपक्ष), सगाजी मोहन कांबळे (अपक्ष), वैभव सर्जेराव जाधव (अपक्ष), सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष), रवी अप्पा काळे (अपक्ष), हनुमंत नामदेव वीर (अपक्ष), जावेद बशीर शेख (अपक्ष), महादेव गौतम मोहिते (अपक्ष), संजय ज्ञानदेव कुचेकर (अपक्ष), संभाजी मधुकर चव्हाण (अपक्ष) हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.

Visit : Policenama.com