‘अंडरवर्ल्ड’ डॉन दाऊदचे लोक भाजपमध्ये, ‘हा’ खासदार जेजे हत्याकांडातील आरोपी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता प्रचाराचा धुराळा जोरात उडणार आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असणारे पाहू लोकं भाजपमध्ये असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या आयटी सेलमध्ये ‘सीआयए चे एजंट असल्याच्या गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

जेजे हत्याकांडातील आरोपी भाजपमध्ये
जेजे यांच्या हत्याकांड प्रकरणात भाजपचा खासदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. गोंडयाचे खासदार बीजभूषण शरणसिंग हे आरोपी असल्याचे देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

आघाडीचा एकच जाहीरनामा
त्याचबरोबर आघाडीच्या जाहीरनाम्यावर बोलताना ते म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा जाहीरनामा तयार करणार नाही. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही एकच जाहीरनामा तयार करणार असून आज तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच 125-125 हा फॉर्म्युला नक्की झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मनसे आघाडीत नसल्याचे देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली.

दरम्यान, भाजपचा राष्ट्रवाद हा खोटा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच आम्ही खरे राष्ट्रवादी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Visit : policenama.com