माढा, सातारा, बार्शी, उस्मानाबाद आणि करमाळयात बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी राष्ट्रवादीची मार्चेबांधणी, दिग्गजांना उतरवणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या अनेक आजी माजी आमदारांनी पक्षाला राम राम करत सेना भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठी गळती लागल्याचे पहायला मिळाले होते.

राष्ट्रवादीनेही पक्षाला लागलेल्या गळतील लक्षात घेऊन आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने भाजपच्या नाराज उमेदवारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याप्रमाणे राष्ट्रवादीने विधानसभा मतदार चासपाण्यासाठी सुरुवात केली आहे.

करमाळा मतदारसंघ
मागील निवडणुकीत रश्मी बागल यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी रश्मी बागल यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून लढलेल्या संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी करमाळ्यातून उतरवण्याची शक्यता आहे.

सातारा मतदारसंघ
साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रराजेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. सातारा जिल्हा हा खरंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यंदाच्या निवडणुकीत साताऱ्याचा गड राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

उस्मानाबाद मतदारसंघ
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राणाजगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादीने उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं होतं. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर आता राणा पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. पाटील यांनी पक्ष सोडू नयेत, यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यानंतरीही जर राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याला गळाला लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

बार्शी मतदारसंघ
बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बाळराजे पाटील यांना संधी दिली जाऊ शकते किंवा भाजपच्या राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी आपल्याकडे खेचू शकते.

माढा मतदारसंघ
माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बबनदादा शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवाजी कांबळे यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

दरम्यान राष्ट्रवादी भाजपच्या पळवापळविला त्यांच्यातीलच नाराज नेत्यांना सोबत घेऊन उत्तर देण्याची तयारी करत आहे तसेच अनेक ठिकाणी नव्या चेहर्यांनाही संधी देण्याचा विचार राष्ट्रवादीत सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like