Pune Police MCOCA Action | वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या शुभम भोसले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवणाऱ्या चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगार शुभम भोसले व त्याच्या इतर 7 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

आरोपी शुभम भोसले व त्याचे इतर साथीदार हतात शस्त्र घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी जीव वाचवण्यासाठी फिर्यादी आंबेडकर वसाहतीच्या दिशेने पळाले. त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन वसाहतीच्या बाहेर पार्क केलेल्या दुचाकी तसेच तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच धारदार शस्त्र हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात आयपीसी 143, 144, 147, 148, 149, 504, 506, 427 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 10 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास जुना मुंढवा रोडवरील वडगाव शेरी येथे घडला होता.

याप्रकरणी टोळी प्रमुख शुभम महेंद्र भोसले (वय-27 रा. बंडगार्डन पुणे), संकेत सुरेश कांबळे (वय-27 रा. गणेशनगर, येरवडा), आकाश आनंद बेत्ती (वय-20 रा. वडगाव शेरी), योगेश संजय शिरसाठ (वय-21 रा. नवले चाळ, वडगाव शेरी) यांना अटक केली आहे. निहाल उर्फ मोन्या संजय भालेराव (रा. गणेशनगर, वडगाव शेरी) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर या प्रकरणात दोन महिला व एका व्यक्तीला अटक पूर्व जामीन मिळाला आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge),
पोलीस निरीक्षक गुन्हे मनिषा पाटील (PI Manisha Patil),
सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे (API Bhagwan Kamble),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस अंमलदार राजेश नवले,
रामचंद्र गुरव, बबनराव केदार, नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार, एकजण ताब्यात; वडगाव शेरी परिसरातील घटना

मुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील चाळे, वाघोली परिसरातील घटना

वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या नितीन रणझुंजार टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 101 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA