Pune Pimpri Chinchwad Crime News | तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भवानी पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पोलिसांकड केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून तीन तरुणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केले. तसेच तरुणाच्या आईचा मोबाईल फोडून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार काशेवाडी भवानी पेठ येथे शुक्रवारी (दि.15) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत प्रशांत विशाल चव्हाण (वय-25 रा. लक्ष्मी कुंज बिल्डींग, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महेश उर्फ मॉटी सुनील निंधानिया (रा. हरकार नगर, भवानी पेठ), अनिकेत सुदाम चव्हाण, कार्तिक वाघेला यांच्यावर 324, 323, 504, 506, 427, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्य़ादी आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाले होते. याबाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात (Pune Police) आरोपींविरुद्ध शुक्रवारी तक्रार (FIR) केली होती. याबाबत आरोपींना माहिती झाल्यानंतर ते प्रशांत चव्हाण याच्या घरी आले. पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले. मात्र चव्हाण यांनी तक्रार मागे घेतली नाही. याचा राग मनात धरुन आरोपींनी चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांची आई मध्ये आली असता त्यांनाही शिवीगाळ करुन मोबाईल फोडला. तसेच तक्रार मागे घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, पिंपरी चिंचवडमधील घटना

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा सपासप वार करुन खून, चाकण परिसरातील घटना

वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या शुभम भोसले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार, एकजण ताब्यात; वडगाव शेरी परिसरातील घटना