महाराष्ट्राच तेलंगणाला मोठ ‘गिफ्ट’ ! ‘कालेश्‍वरम लिफ्ट सिंचाई’ परियोजनेच्या उद्घाटनाला 3 राज्याचे CM ‘एकत्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी 80 हजार कोटी रुपयांचा कालेश्वरम लिफ्ट सिंचाई परियोजनेचे उद्घाटन केले. या परियोजनेला जगातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मते दक्षिणी राज्यासाठी ही परियोजना एका वर्षात 45 लाख एकर जमिनीवर दोन पिकांच्या सिंचाई परियोजना मदतगार ठरु शकते. तेलगणा राज्य सरकारने सांगितले की यामुळे मिशन भागीरथ पेयजल अपुर्ती परियोजनेला 40 टीएमसी पाणी पुरवण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती –
या परियोजनेतून ग्रेटर हैदराबादच्या एक कोटी लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल. याशिवाय परियोजनेमुळे राज्यात हजारो उद्योगांना 16 टीएमसी पाणी पुरवठा करण्यात येईल. या योजनेच्या उद्घाटनावेळी तेलगंणा आणि आंध्रप्रदेशचे राज्यपाल ई एस एल नरसिन्हा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी उपस्थित होते.

महाराष्ट्रची तेलंगणाला भेट –
फडणवीस यांनी सांगितले की, ही परियोजना तेलंगणाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. ही योजना महाराष्ट्राच्या जनतेकडून तेलंगणाच्या जनतेला भेट आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की सहभागी संघवाद असला पाहिजे आणि त्यामुळे दोन्ही राज्य तेलंगणा आणि महाराष्ट्राने सहयोग केला आहेत. मला आनंद आहे की तेलंगणाने रेकॉर्ड करणाऱ्या वेगाने हे काम पुर्ण केले आहे.

चंद्रशेखर सरकारने 2016 साली महाराष्ट्र सरकार बरोबर करार केला होता आणि अनेक दिवसांपासूनचे मतभेद दूर करत मेदिगड्डा मध्ये परियोजना निर्माण करण्याचा अडथळा दूर केला. चंद्रशेखर राव यांनी मे 2016 साली या परियोजनेच्या काम सुरु केले होते.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची