ताज्या बातम्यामुंबईराजकीय

Maharashtra Budget 2022 | अर्थमंत्री अजित पवार यांची पुण्यासाठी मोठी घोषणा ! 300 एकरवर उभारणार इंद्रायणी मेडिसिटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2022) अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022 – 23 चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर केला. गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (Financial Survey Report) सादर करण्यात आला. कृषी क्षेत्राने (Agricultural Sector) कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. तर निर्बंध हटल्यानंतर परत भरारी घेत उद्योग व सेवा क्षेत्राने राज्याच्या प्रगतीला बळ दिल्याचे चित्र 2021 – 22 च्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) 11 हजार कोटींच्या निधी देणार असल्याचे सांगत पुण्यात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी (Indrayani Medicity in Pune) उभारणार असल्याची घोषणा केली.

 

विधानसभेत अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर करताना अजित पवारांनी सांगितले की, कोविड (COVID – 19) काळात राज्यात झालेल्या कामाचं देशभरात कौतुक केले. कोविड काळात अनेक योद्धे सक्षमपणे लढा देत होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी (Maze Kutumb Mazi Jababdari) अंतर्गत 8 कोटी 74 लोकांना कोविडच्या लसीचा (Vaccine) पहिला डोस घेतला. राज्यात 15 लाख 87 हजार नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस (Booster Dose) दिला आहे. राज्यात नांदेड (Nanded), जालना (Jalna), अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara) आणि सातारा (Satara) प्रथम श्रेणीतील ट्रॉमा सेंटर (Trauma Center) उभारण्यासाठी 18 कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. राज्यातील आरोग्य क्षेत्रातील सुविधांसाठी 11 हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. राज्यात या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3183 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.

 

टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला (Tata Cancer Research Center) रायगड जिल्ह्यात (Raigad District) खानापूरमध्ये जमीन देण्यात येणार आहे.
शिवआरोग्य जिल्हा योजनेंतर्गत (Shiv Arogya Zilla Yojana) प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय (Telemedicine Hospital) उभारण्यात येणार आहे.
8 कोटी रुपयांची 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने (Mobile Cancer Diagnosis Vehicles) पुरवण्यात येतील.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी (Cataract Surgery) शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा राबवणार आहे.
त्याचसोबत अकोला येथे स्त्रि रुग्णालयाची स्थापना करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी आज केली.

 

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापन करणार

ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवआरोग्य योजना सुरु करणार

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय पातळीवर याचा विस्तार करणार

पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा शासनाचा प्रयत्न

सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार 2061 कोटी रुपयांचा खर्च करणार

देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावं म्हणून प्रवेश संख्येत वाढ करणार

 

Web Title :- Maharashtra Budget 2022 | indrayani medicity to be set up on 300 acres in pune finance minister ajit pawars announcement maharashtra budget 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Back to top button