Maharashtra Budget Session 2023 | शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात ग्वाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session 2023 | विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधकांनी कांद्याच्या (Onion) मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभेत (Legislative Assembly) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी विरोधकांनी नाफेडमार्फत (Nafed) कांदा खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत  बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Maharashtra Budget Session 2023)

… तर हक्कभंग आणा

दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू घेत विरोधकांना चांगलेच सुनावले.
फडणवीस म्हणाले, नाफेडने (Nafed) खरेदी सुरु केली आहे.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पश्नावर उत्तर हेवे आहे की विरोधकांना राजकारण करायचे आहे? आम्ही सांगत असलेली माहिती चुकीची आहे असे वाटत असेल तर हक्कभंग आणा, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.

Web Title :- Maharashtra Budget Session 2023 | Chief Minister Eknath Shinde testified in the House that the government is firmly behind the onion producers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Priyanka Chopra | ‘सिटाडेल’ वेब सिरीजमधील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक आउट; फर्स्ट लूक पाहून चाहत्यांनी केले भरभरून कौतुक

Maharashtra Budget Session 2023 | गळ्यात कांद्याची माळ, डोक्यावर टोपली; विधिमंडळाबाहेर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

Maharashtra Politics | उद्धव ठाकरेंची स्थिती ‘शोले’मधील आसराणींसारखी, अमित शहांना ‘मोगॅम्बो’ म्हणाऱ्या ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)