Maharashtra Budget Session 2023 | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी, देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं, म्हणाले- ‘आम्ही हे खपवून घेणार नाही, हे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget Session 2023 | महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार पासून सुरु झाले. अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session 2023) पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्यात खडाजंगी झाली. शिवसेना पक्षाचे नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) अधिक आक्रमक झाला आहे.

भास्कर जाधव यांनी सभागृहातील भाषणात मला माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाहीत असा आरोप केला.
तसेच हे काय सुरु आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भास्कर जाधव यांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. भास्कर जाधव अशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांना (Assembly Speaker) धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरु झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्देशानंतरही शिवसेनेकडून सर्व 55 आमदारांना आज पासून सुरु
होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हीप बजावण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कारवाई करु नये, असं निर्देश दिले आहेत.
पण, अधिवेशनाला हजर राहण ही कारवाई होत नाही.
हा व्हीप आहे की सर्वांनी सभागृहात हजर राहावं, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले
(Shiv Sena Pratod Bharat Gogawale) यांनी दिली.

Web Title :- Maharashtra Budget Session 2023 | maharashtra budget session 2023 the budget session of the maharashtra has started from today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा

Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून शहरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’