Homeताज्या बातम्याMaharashtra Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ...

Maharashtra Cabinet Expansion | राज्य मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि महेश लांडगे यांना संधी?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | तब्बल ४० दिवसांहून अधिक काळ रखडलेला राज्याचा मंत्री मंडळ विस्तार उद्या (मंगळवार) होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. या मंत्री मंडळामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातून कितीजणांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. प्रामुख्याने भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची मंत्री मंडळात वर्णी लागण्याची शक्यता अधिक असून ज्येष्ठ आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), राहुल कुल (MLA Rahul Kul), महेश लांडगे (MLA Mahesh Landge) आणि सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble) यांच्यापैकी किती जणांना ‘लॉटरी’ लागणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

 

शिवसेनेतील (Shivsena) फुटीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MVA Government) कोसळले. शिवसेनेतून फुटून निघालेले एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपासोबत (BJP) युती करत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पदनावती करत उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती केली. तर शिवसेनेत उभी फूट पाडणार्‍या शिंदे यांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढविला. दरम्यान, शिवसेनेने अगदी पक्ष फुटीपासून प्रत्येकच बाबतीत न्यायालयात दाद मागितल्याने सरकार स्थापन केल्यानंतरही शिंदे अडचणीतच आल्याचे वरकरणी दिसत आहे. तसेच भाजपसोबत सत्ता स्थापन करताना मंत्री पदांच्या वाटपावरूनही शिंदे गट आणि भाजपमध्ये ताणाताणी सुरू आहे. यातूनच मंत्री मंडळाचा विस्तार रखडल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्यशकट हाकत आहेत. यावरून विरोधकांनी टीकेचा सूर लावल्याने सत्ताधार्‍यांनी मंत्री मंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

 

पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने मंत्रीपद मिळणार नाही, हे जवळपास निश्‍चित आहे. तुलनेने अडीच वर्षांपासून सत्तेपासून दूर राहीलेल्या भाजपमध्ये इच्छुकांची भलीमोठी रांग आहे. कोथरूड येथून प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेटमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आणखी किमान दोनजणांना राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागेल, असे दिसून येते. यामध्येही पर्वतीतून तिसर्‍यांदा विधानसभेत पोहोचलेल्या माधुरी मिसाळ यांचा सर्वात वरचा क्रमांक असून सामाजिक दृष्टीकोनातून पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनिल कांबळे हे देखिल स्पर्धेत आहेत. पिंपरी चिंचवड मधून आमदार महेश लांडगे आणि जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता रासपचे बारामती लोकसभा मतदार संघातील दौंडचे आमदार राहुल कुल यांचे देखिल नाव आघाडीवर आहे.

 

माधुरी मिसाळ या मंत्री मंडळातील महिला चेहेरा ठरू शकणार आहेत.
तसेच त्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)
यांच्या नजीकच्या असल्याने मुंडे यांचा क्रोध शांत करण्यासाठीही मिसाळ यांची वर्णी लागू शकते.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अनेक वर्षांनी मंत्रीपद देउन
आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC and PCMC Elections 2022) पार्श्‍वभूमीवर भाजपची
पुन्हा सत्ता आणण्याचा प्रयत्नही भाजपकडून होण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | A chance for Chandrakant Patil, Madhuri Misal and Mahesh Landge from Pune district in the state cabinet?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

 

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News