Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री ‘कोट्याधीश’, सर्वाधिक श्रीमंत लोढा तर भुमरेंची संपत्ती सर्वात कमी; जाणून घ्या कोणाकडे किती संपत्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) आजचा मुहूर्त मिळाला. राजभवनातील (Raj Bhavan) दरबार हॉलमध्ये (Durbar Hall) 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आजच्या मंत्रिमंडळात भाजपचे आमदार (BJP MLA) मंगलप्रभात लोढा हे सगळ्यात श्रीमंत आहेत. तर संदीपान भुमरे यांची संपत्ती सगळ्यात कमी आहे. 18 पैकी 6 मंत्र्यांवर एकही गुन्हा दाखल नाही.

 

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. तर शिंदे गटातील उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्यावर एकही गुन्हा (FIR) दाखल नाही.

मंत्र्यांची संपत्ती आणि गुन्हे

1. राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) – 24 कोटींची संपती, 0 गुन्हे

2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) – 5.99 कोटींची संपती, 2 गुन्हे दाखल

3. गिरीश महाजन (Girish Mahajan) – 25 कोटींची संपती, 0 गुन्हे

4. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) – 11.4 कोटींची संपत्ती, 2 गुन्हे दाखल

5. विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) – 27 कोटींची संपती, 9 गुन्हे दाखल

6. उदय सामंत (Uday Samant) – 4 कोटींची संपती, 0 गुन्हे

7. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – 20 कोटींची संपती, 8 गुन्हे दाखल

8. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) – 82 कोटींची संपती, 0 गुन्हे

9. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) – 2 कोटींची संपती, 9 गुन्हे दाखल

10. सुरेश खाडे (Suresh Khade) – 4 कोटींची संपती, 3 गुन्हे दाखल

11. मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) – 441 कोटींची संपती, 5 गुन्हे दाखल

12. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – 5 कोटींची संपती, 1 गुन्हा दाखल

13. दादा भूसे (Dada Bhushe) – 10 कोटींची संपती, 1 गुन्हा दाखल

14. अतुल सावे (Atul Save) – 22 कोटींची संपती, 6 गुन्हे दाखल

15. तानाजी सावंत (Tanaji Sawant) – 115 कोटींची संपती, 0 गुन्हे

16. संजय राठोड – 8 कोटींची संपती, 4 गुन्हे दाखल

17. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) – 14 कोटींची संपती, 0 गुन्हे

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | bjp leader and buildier mangalprabhat lodha richest sandipan bhumre have less property maharashtra cabinet expansion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणार्‍यांना खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिवस’; ‘त्या’ आमदाराचा टोला

 

Facebook | 15 वर्षाच्या मुलीचे HIV पॉझिटिव्ह मुलाशी फेसबुकवर झाले प्रेम, प्रेमात स्वत: ला टोचून घेतले ‘एड्सचे इंजेक्शन’

 

Atal Pension Yojana-APY | मोदी सरकारच्या ‘या’ सुपरहिट स्कीममध्ये वृद्धापकाळ जाईल आनंदात, दरमहिना मिळतील 5,000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ