Maharashtra Cabinet Expansion | मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर; खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Expansion | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यांना खातेवाटप करण्याचे अद्याप रखडले आहे. दरम्यान, मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू होती. हा तिढा आता सुटला असल्याचे समजते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आता पावसाळी अधिवेशनानंतरच होणार असल्याची चर्चा आहे. तसेच खातेवाटप आज किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

सगळ्याच पक्षातील नेते विस्ताराकडे (Maharashtra Cabinet Expansion) लक्ष लावून बसले आहेत. अजित पवार गटाचे रखडलेले खाते वाटप अधिवेशनाआधी मार्गी लागण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर हा मंत्रिमंडळाचा तिढा सुटला असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी बुधवारी रात्री दिल्लीत शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याची माहिती आहे.

दरम्यान, या चर्चेनंतर अर्थखाते (Finance Minister) राष्ट्रवादीकडे येईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर खातेवाटपवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता दोन गट निर्माण झाले आहेत तर याबाबतची न्यायालयीन लढाई राष्ट्रवादीला लढावी लागणार आहे, यासंबधी देखील चर्चा अमित शहा यांच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.

 

Web Title :  Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde cabinet portfolio allocation today
but cabinet expansion after monsoon session devendra fadnvis ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा