Maharashtra Politics News | अजित पवारांना आणखी एका आमदाराची ताकद! परदेशातून परताच युवा आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली त्यावेळी परदेशात असलेले कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) नुकतेच देशात परतले आहेत. परत येताच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी (Maharashtra Politics News) घडत असताना काळे कुटुंबीय परदेशात गेले होते. तेथून त्यांनी सुरवातीला शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असल्याचे संकेत दिले होते. मात्र, भारतात येताच त्यांनी अजित पवारांना पाठिंबा देत असल्याचे जाहिर केलं.

आशुतोष काळे हे भारतात परत आल्यानंतर अजित पवारांच्या भेटीला गेले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या काळे यांना महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद (President Saibaba Sansthan Shirdi) देण्यात आले होते. अजित पवारांना पाठिंबा जाहीर करताना शरद पवार साहेब आमचे दैवत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

आशुतोष काळे यांनी ट्विट करुन म्हटले, कोपरगाव मतदारसंघाच्या (Kopargaon Constituency) विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठींबा दिला. आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आमचे दैवत आहेत. त्यांचे आशिर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठींबा राहील याची मला खात्री आहे.

Web Title :  Maharashtra Politics News ajit pawar has the strength of another mla ashutosh kale supported

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा