Maharashtra Rain Update | आज कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यातील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी पाऊसच नसल्याचे चित्र आहे. कोकणासह (Konkan) मुंबई उपनगर (Mumbai) ठाण्यात (Thane) चांगला पाऊस पडत आहे. तसेच विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांत चांगला पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. मात्र, इतर ठिकाणी पाऊस झाला नाही. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

 

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज (गुरूवार) राज्यात जोरदार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातह (Vidarbha) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

वाशिमच्या (Washim) रिसोड तालुक्यात आज अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. कोयाळी परिसरात अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये नुकतेच पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाचे व मागील महिन्यात लागवड केलेल्या हळदीचे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.
बागायत क्षेत्रात शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र दक्षिण नगर जिल्ह्यातील जिरायती पट्ट्यात अजूनही
अनेक ठिकाणी पेरण्या अयशस्वी झाल्या. नगर तालुक्यातील वाल्की, खडकी भागातील फळबागांना सुरुवात झाली आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Rain Update | maharashtra rain updates rainfall in some parts of the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा