Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना, उद्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला नाही. राज्यातला रखडलेला मंत्रिमडळ विस्ताराला काही मुहूर्त मिळत नाही, असे चित्र सध्या पहायला मिळत आहे. कारण उद्या होणारा मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी (दि.8) होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सुनावणीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Maharashtra Cabinet Expansion) निर्णय अपेक्षित आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपले सर्व बैठका रद्द केल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे देखील आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) उद्याच होणार असल्याची माहिती समोर आली होती. भाजपचे (BJP) आठ तर शिंदे गटातील (Shinde Group) सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी देखील माहिती समोर आली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधकांकडून सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते.
मात्र चार आठवडे झाले तरी अद्याप विस्तार होत नसल्याने नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंत्रिमडळ विस्ताराबाबत संकेत देताना रविवारच्या आधी विस्तार होईल असे स्पष्ट केले होते.
त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची गाडी नेमकी कुठे अडकली याची कोणालाही स्पष्टता नाही.

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra eknath shinde cabinet expansion extended says sources

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

 

Osmanabad ACB Trap | अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना पोलीस एसीबीच्या ताब्यात

 

Shivsena MP Sanjay Raut | राऊतांच्या घरात सापडली डायरी, कोट्यावधींचा हिशोब कोडिंगमध्ये, राऊतांच्या अडचणीत वाढ?