Maharashtra Congress | काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!, नेत्याचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांकडून पटोलेंना महिन्याला एक खोका मिळतो’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Congress | मागील काही महिन्यांपासून राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन धुसफूस सुरु आहे. त्यातच एका काँग्रेस नेत्याने (Maharashtra Congress) थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा झाली. त्या सभेला नाना पटोले गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता 16 एप्रिल रोजी नागपूर येथे होणाऱ्या सभेपर्यंत नाना पटोले गुवाहाटीला पोहोचलेले असतील असा आरोप या नेत्याने केला आहे.

काँग्रेस नेते (Maharashtra Congress) आशीष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप करताना म्हटले, नाना पटोले ‘वज्रमूठ’ सभेत (MVA Vajramuth Sabha) गैरहजर होते.
त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते.
सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
16 तारखेला महाविकास आघाडीची नागपूर येथे सभा आहे. तोपर्यंत पटोले गुवाहाटीला पाहण्यास मिळतील.
जबाबदारीने हे वक्तव्य करतोय, असेही देशमुख यांनी सांगितले.

देशमुख पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की आशिष देशमुख जे बोलतो त्याच्या मागे जर वजन असेल तरच बोलतो.
महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपच्या (BJP) विरोधात बोलताना सातत्याने दिसतात.
याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन, असेही देशमुख यांनी सांगितले.

Web Title :-  Maharashtra Congress | ashish deshmukh allegation congress leader nana patole over one khoka eknath shinde
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘रिक्षावाला घाम गाळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती’

 

Pune ACB Trap | पुरंदर : लाच प्रकरणी महिला तलाठयासह दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक