Coronavirus : राज्यात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.54 टक्के

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 हजार 610 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 17 लाख 61 हजार 615 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.54 टक्के इतके झाले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 2 हजार 949 नवे रुग्ण कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात सध्या 5 लाख 4 हजार 406 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर 4 हजार 335 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 73 हजार 383 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात 2 हजार 949 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 18 लाख 83 हजार 365 इतकी झाली आहे.

राज्यात आज 60 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा 2.56 टक्के एवढा झाला आहे. आज नोंद झालेल्या 60 मृत्यूपैकी 27 मृत्यू हे मागील 48 तासामधील आहेत तर 8 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 25 मृत्यू हे एक आठड्यपूर्वी पेक्षा जास्त कालावधीतले आहेत. हे 25 मृत्यू नाशिक -11, अमरावती 6, पुणे 3, परभणी 2, नांदेड 2 आणि नागपूर 1 असे आहेत, महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.