Maharashtra Crime News | बड्या घरच्या 2 उच्चशिक्षित महिलांनी उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल, वाढदिवशी घडलं भयानक, प्रचंड खळबळ

डॉक्टर आणि वकिलाच्या पत्नीनं आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Crime News | नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील वेगवेगळ्या दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Nanded) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. यामध्ये एक डॉक्टरची पत्नी असून दुसरी वकिलाची पत्नी आहे. या दोघींनीही राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दोन्ही घटना एकाच शहरात, एकाच दिवशी झाल्याने नांदेड शहर हादरलं आहे. (Maharashtra Crime News)

 

याबाबत माहिती अशी की, पहिली घटना ही शहरातील विवेकनगर (Viveka Nagar Nanded) भागातील आहे. गजानन जीरोनकर (Gajanan Jironkar) हे एक वकील (Lawyer) आहेत. कुटुंबासह इथे स्वतःच्या घरात राहतात. याच घरात त्यांची पत्नी शिल्पाचा (Shilpa Jironkar) (वय 32) बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. खरंतर शिल्पाच्या मुलाचा आज वाढदिवस होता, त्या वाढदिवसाची तयारी घरात केली जात होती. तेवढ्यात शिल्पाने बाथरूम मधल्या शॉवरला गळफास घैऊन आत्महत्या केली आहे. तर, आत्महत्येपूर्वी शिल्पाने एक पत्र लिहिले असून पोलिसांनी (Police) ते जप्त केलंय दरम्यान यामध्ये काय लिहिलं ते सांगण्यास नकार दिला आहे. (Maharashtra Crime News)

 

दरम्यान, मृत शिल्पाच्या भावाने शिल्पाचा माहेरावरून पैसे आणण्यासाठी सासरचे मंडळी तिचा छळ करत असल्याची तक्रार दिली. यावरून पती गजानन जीरोनकरला भाग्यनगर पोलिसांनी (Bhagya Nagar Police) अटक (Arrested) केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, दुसरी घटना ही शहरातील शिवाजीनगरची (Shivaji Nagar Nanded) आहे.
शहरातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ असलेल्या अर्जुन मापारे (Arjun Mapare) यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दंतरोग तज्ञ असलेले सागर मापारे (Sagar Mapare) हे वाडिया फॅक्टरी भागात पत्नी मुलांसह राहतात.
त्यांच्या पत्नी अनुपा Anupa Mapare (वय, 35) यांनी काल दुपारी मुलांना खायला घालून त्या आपल्या रूममध्ये गेल्या.
आई बराच वेळ झाली तरी बाहेर आली नसल्याने मुलांनी दरवाजा ठोठावला. पण, आईने प्रतिसाद दिला नाही.
नंतर मोलकरणीने खिडकीतून पाहिल्यावर अनुपा या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या.
अनुपा यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, या दोन्ही घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दोन्हीही घटनेचा अधिक तपास पोलिस (Nanded Police) करीत आहेत.

 

Web Title :- Maharashtra Crime News | suicide of two highly educated women in nanded wife of a doctor and the wife of lawyer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar | ‘त्या’ वेळी लतादीदींचा आवाज ऐकून पंडित नेहरुंनाही अश्रू अनावर झाले…

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता, हे गुंडाराज…’

 

Lata Mangeshkar-Sachin Tendulkar | लतादीदींनी सांगितला होता सचिन तेंडूलकरबद्दलचा भावूक किस्सा ! म्हणाल्या होत्या – ‘जेव्हा सचिन मला पहिल्यांदा आई म्हटला होता…’