CM पदासाठी फडणवीस, पवार, शिंदे नकोत, IPS अधिकाऱ्यानं सुचवली ‘ही’ दोन नावं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाहीये. बहुमत जिंकलेले भाजप आणि शिवसेना मुख्यमंत्री पदावरून आडून बसले आहेत. त्यातच आता राज्याचे माजी सनदी अधिकारी (IPS) सुरेश खोपडे यांनी यामध्ये उडी घेतली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार हे तिघंही मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नसल्याचे मत व्यक्त करुन सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2503095573113024&id=100002378178261

सुरेश खोपडे यांनी 1992 च्या दंगलीत भिवंडीसारख्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान समर्थपणे पेललं होतं. त्यातून त्यांचा अनुभव, प्रशासकीय जाण आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय येतो. त्यामुळे त्यांनी फेसबुकवर मुख्यमंत्रीपदाबाबत ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावेत ?’ या शीर्षकाखाली लिहून पोस्ट व्हायरल केली आहे. एका सनदी अधिकाऱ्याने अशाप्रकारे पोस्ट व्हायरल केल्याने चर्चेचा विषय ठरली आहे.

सुरेश खोपडे लिहतात, “Bjp तर्फे नेतेपदी फडणवीस निवडले गेले पण ते तर RSS च्या तालमितील तयार झालेले हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन भूतकाळाकडे राज्याला घेऊन चाललेले तालिबानी वृत्तीचे प्रतिगामी नेते आहेत. SS तर्फे शिंदे हे नेते पदी विराजमान झालेत. ते पुराणमतवादी, शिवसेना स्टाईलने म्हणजे दडपशाहीने काम करणारे RSS प्रणित हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते वाटतात. राष्ट्रवादी तर्फे निवडलेले अजित पवार हे अहंकारी व सरंजमदारी पद्धतीने काम करणारे राजकारणी आहेत.”

“राजकीय नेतृत्व कुणी करावे असा जर मला प्रश्न विचारला तर मी उत्तर देईन की त्याने एकविसाव्या शतकाचा वारा हुंगलेला असावा. जागतिकीकरनाची चव चाखलेली असावी. नजर रंगाच्या झेंड्याने कलुषित नसावी. त्याला गमवण्या सारखे काहीच नसावे. त्याची नजर 21व्या शतकाच्या दिशेने रोखलेली असावी. रोमारोमात नाविन्याची ओढ असावी. अशी व्यक्ती एकतर आदित्य ठाकरे किंवा रोहित पवार दिसते. बाकीच्याकडे अनुभव आहे पण ते त्याचा वापर आहे ती व्यवस्था तशीच ठेवण्याकडे (स्टेटस को) व व्यक्तीगत स्वार्थ साधण्याकडे करतील. नवी दिशा देण्यासाठी नव्हे ! आमूलाग्र बदल घडविण्यासाठी “आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग (चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणे)” करणारांची गरज आहे. ते काम तरुणच करू शकतात ! जुन्या खोडांचे काम नाही ! इथंच संजय राऊतांची मेहनत व कौशल्य पणाला लागेल!”

Visit : policenama.com