मोठा दिलासा ! राज्य सरकारकडून वीज दरात मोठी कपात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सगळीकडं थैमान घातलं असल्यानं सर्वच जनता हैराण झाली आहेत. मात्र, त्यातच राज्य सरकारनं राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या वीज नियामक आयोगानं राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही एक्सट्रा भार पडू न देता कमी दरानं वीज देण्याचं नियोजन केलं आहे. याबाबत वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10 ते 12 टक्के आणि औद्योगिक वीज दरात 10 ते 11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. हे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार असल्यानं ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं यापुर्वी वीज बील भरण्यास उशिर झाल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नसल्याचं सांगितलं होते. राज्य वीज नियामक आयोगाकडून केली जाणारी ही कपात मुंबईसह संपुर्ण राज्यात होणार आहे.