Maharashtra Farmer Suicide News | धक्कादायक! पश्चिम विदर्भात १० महिन्यांत १९२७ शेतकरी आत्महत्या; योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र आणि राज्याच्या अनेक कृषी योजना (Agriculture Scheme) असून देखील पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे (Maharashtra Farmer Suicide News) प्रमाण वाढत चालले आहे. मागील १० महिन्यात अमरावती विभागात १९२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अमरावती जिल्ह्यात मागील १० महिन्यात राज्यात सर्वाधिक २६८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले (Maharashtra Farmer Suicide News) आहे.

दुष्काळाने येथील शेतकरी बांधव हैराण झाला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशी निसर्गाची अवकृपा झेलत जीवन पुढे रेटण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करत आहे, या प्रसंगाशी दोन हात करताना काहीजण हताश होऊन आत्महत्या करत आहेत.

निसर्गाची अवकृपा झाल्याने हातातोंडाशी आलेली उभी पिके वाया जातात. यामुळे अमरावती विभागात २००१ पासून १८ हजार ८९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी केवळ ८ हजार ८६४ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र ठरली.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून (State Govt) १ लाख रुपयांची मदत केली जाते. नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांसाठीच ही मदत मिळते. अनेक समित्यांनी अनेक अहवाल सादर केले, परंतु शिफारशी, उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी उपेक्षितच आहे. (Maharashtra Farmer Suicide News)

बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून सामाजिक सहाय्य व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
समुपदेशनाची व्यवस्था आहे. परंतु, उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे.

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा हे ६ जिल्हे
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे मानले गेले आहेत. या जिल्ह्यांसाठी २००६ मध्ये
केंद्र सरकारने ३ हजार ७८५ कोटींचे तर राज्य सरकारने १ हजार ०७५ कोटींचे पॅकेज दिले होते.

अनेक योजना राबवण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.
पण आत्महत्यांचे सत्र वाढतच चालले आहे. यास कारण म्हणजे योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही,
अशी तक्रार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | कडाक्याच्या थंडीत पहाटे चार वाजता जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना केले संबोधित,
म्हणाले…