‘ठाकरे सरकार’चं खातेवाटप ठरलं ! गृह आणि नगरविकास खातं शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याकडे, जाणून घ्या इतर वाटप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवदीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक आघाडीत मंत्रिपदांवरून तिढा निर्माण झाल्याने खातेवाटप रखडले होते. गृह खात्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. मात्र, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेअंती खाते वाटपावर सहमती झाली. त्यानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती सध्या देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना देऊन एक वेगळी प्रथा सुरू केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यातील गृहखाते राष्ट्रवादीकडे जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खाते कायम राहील.

1997 मध्ये एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये शिवसेना विधीमंडळाचे गटनेते म्हणून शिंदेंची नियुक्ती झाली. शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री (एमएसआरडीसी, सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते.

असे असेल संभाव्य खातेवाटप –

काँग्रेस : महसूल, ऊर्जा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण. तसेच (राज्यमंत्री) सहकार, नगरविकास, गृह (ग्रामीण)
राष्ट्रवादी : गृह, सहकार, वित्त, ग्रामविकास, पणन, सामाजिक न्याय, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य. जलसंपदा, अल्पसंख्यांक
शिवसेना : नगरविकास, उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, एमएसआरडीसी, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, वन, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पाणीपुरवठा, अन्न व औषधी पुरवठा, पर्यटन

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/