ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व नागरिकांचं लसीकरण मोफत करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभुमीवर केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देत 1 मे नंबर 18 वर्षाच्या पुढील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत केले जाणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

लसीकरण मोहिमेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार असल्याचं कालच (शनिवार) सांगितलं होतं. मात्र, ज्यांची पत आहे त्यांनी लस स्वखर्चाने घ्यावी अन् गरिबांना सरकार लस उपलब्ध करून देईल असं पवार म्हणाले होते. आज (रविवार) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील सर्व नागरिकांचं राज्य सरकार मोफत लसीकरण करेल अशी माहिती वृत्तसंस्थेला दिली आहे. राज्यातील 18 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंतच्या सर्व लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी 28 एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.