काय सांगता ! होय, मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राज्यपालांनी दिला फक्त तासभर वेळ, सत्ताधारी नाराज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकासाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी(दि. 30) होणार आहे. पंरतु सत्ताधारी पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कारण या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केवळ एक तासाचाच वेळ दिला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दुपारी एक वाजता होणार आहे. परंतु शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवावा अशी तोंडी सूचना राजभवननावरील राज्यपाल कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयाला देण्यात आली आहे.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारासाठी एका तासाचा वेळ मिळाल्यानंतर अशी चर्चा सुरू आहे की, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवण्याची घाई करणाऱ्या राजभवनाला दुपारी दोनच्या आत शपथविधी उरकण्याची घाई एवढी घाई का आहे.

राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे की, मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाले असून राज्यपालांच्या सूचनेनुसार त्यास उत्तर देण्यात येईल.

अनेक मंत्र्यांचा शपथविधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शपथ घेणार आहेत. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की, या कार्यक्रमाला जास्त वेळ लागणार आहे. कारण माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते शपथ घेणार आहेत. परंतु केवळ एकच तास मिळाल्यानं आता सत्ताधारी नाराज आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/