Maharashtra Gram Panchayat Election | नितीन गडकरींना धक्का! गावची ग्रामपंचायत गमावली, नागपुरात काँग्रेसला चांगले यश

नागपूर : Maharashtra Gram Panchayat Election | राज्यातील २९५० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल येऊ लागले असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप महायुतीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला तुलनेने कमी ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. असे असले तरी नागपुरमध्ये भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मोठा धक्का बसला आहे. (Maharashtra Gram Panchayat Election)

गडकरींची गावची धापेवाडा ग्रामपंचायत काँग्रेसने जिंकली आहे. शिवाय, जिल्ह्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायती मिळवत काँग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. येथे भाजपला केवळ ६ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. (Maharashtra Gram Panchayat Election)

नागपूरमध्ये १२ तालुक्यांतील ३५७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. येथे ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या धापेवाडा गावाचाही समावेश असल्याने या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कामठी तालुक्यातील १०
ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये सरपंचपदासाठी भाजप आणि काँग्रेस समर्थित गटातील प्रत्येकी ५
उमेदवार विजयी झाले. तालुक्यात भाजपला टक्कर देण्यात काँग्रेस नेते सुरेश भोयर यांना चांगले यश आल्याचे मानले जात आहे.

भाजप समर्थित गटाचे कादीर इमाम हे छवारे तालुक्यातील बाभूळखेडा ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले.
तर वारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या काँग्रेस समर्थित रत्ना अजबराव उईके विजयी झाल्या आहेत.
कवठा ग्रामपंचायत येथील सरपंचपदाचे भाजप समर्थित गटाचे नीलेश श्रीधर डुफरे हे विजयी झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC On Dengue Outbreak | डेंग्यूच्या साथीचा पावसाळ्याचा ‘पिक पिरियड’ संपल्यानंतर महापालिकेची औषध फवारणीची निविदा प्रक्रिया

Pune Crime News | पुणे हादरले! घरी सोडण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

Illegal Hoardings In Pune | पुणे शहरातील होर्डिंगचे होणार ऑडिट, अनधिकृत होर्डिंगकडून मागील वर्षाची वसुली केली जाणार