‘या’ 4 गोष्टींमुळे बदलली राजकीय परिस्थिती, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ठरणार गेमचेंजर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेनंतर चार महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवणूक होणार आहे आणि याचा २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे दोनीही राज्यांत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या दोनीही राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे.

लोकसभेनंतर देशातील या पहिल्याच निवडणूका आहेत त्यामुळे केंद्र सरकारचा राज्यातील निवडणुकांवर कितपत प्रभाव पडेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच गेल्या काही दिवसांतील भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याबाबतचा परिणाम हा सुद्धा या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे. काश्मीरचे 370 कलम रद्द झाले.तीन तलाक विरोधात कायदा करण्यात आला अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या नियमांचे जनतेने प्रत्यक्षात स्वागत केले मात्र या निर्णयावर भाजप सरकार राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

लोकसभेनंतरची पहिली निवडणूक
महाराष्ट्र आणि हरियाणा या दोनीही राज्यांमध्ये भाजपने लोकसभेच्या वेळी मोठे यश सपांदन केले होते. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचे पडसाद पाहायला मिळणार आहेत त्यामुळे केंद्र सरकारचेही विशेष लक्ष या निवडणुकांकडे असणार आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतरची पहिली निवडणूक
काश्मीरचे 370 कलम रद्द केल्यानंतर जनतेने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले होते त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वापरला जाणार आहे. नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत याचा उल्लेखही केला होता त्यामुळे आता हा मुद्दा निवडणुकीत असणार आहे.

तीन तलाक निर्णयानंतरची पहिली निवडणूक
मुसलमान महिलांसाठी  भारतीय जनता पार्टी वारंवार तीन तलाक कायदा आणण्यासाठी प्रयत्न करत होती. गेल्या वेळेस राज्यसभेत हा कायदा पास करण्यात सरकारला यश आले नव्हते मात्र या वेळेस पुन्हा सत्ता मिळताच सरकारने दोनीही सभागृहात तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. याचाही निवडणुकीमध्ये मोठा परिणाम दिसून येणार आहे.

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली परीक्षा
सलग दोन लोकसभामध्ये देशातील सर्वात मोठ्या पक्षाला हार पत्करावी लागली त्यामुळे राहुल गांधींनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा सर्व सूत्रे सोनिया गांधींच्या हातात दिली गेली. त्यामुळे राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांना काँग्रेस पक्ष कशाप्रकारे सामोरा जातो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

या व्यतिरिक्त अर्थव्यवस्थेबाबतचे अनेक निर्णय, बँकांचे विलीनीकरण तसेच बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रकारचे अनेक विषय विरोधक मोठ्या आक्रमकतेने मांडू शकतात.

You might also like