Maharashtra HSC Result 2023 | बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी ! कोकणात सर्वाधिक तर मुंबईमध्ये सर्वात कमी टक्के निकाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra HSC Result 2023 | फेब्रुवारी-मार्च २०२३ घेण्यात आलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावी परीक्षेचा निकाल (12th Result) आज (दि. २५) दुपारी दोन नंतर ऑनलाइन जाहीर होणार आहे. निकालामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये उत्सुकता व भिती आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे (Pune), नागपूर (Nagpur), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), अमरावती (Amravati), नाशिक (Nashik), लातूर (Latur) व कोकण (Konkan) या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Maharashtra HSC Result 2023) परीक्षा घेण्यात आली होती.

 

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी अधिकची माहिती देत सांगितले आहे की, या वर्षी राज्यातील ३ हजार ९९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे कोकण विभागाने ( Konkan Division) बाजी मारली असून कोकणाचा सर्वाधिक 96.01 टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल मुंबईचा असून, 88.13 टक्के लागला आहे अशी माहिती दिली आहे. (Maharashtra HSC Result 2023)

एकूण परीक्षेस बसलेल्या १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या ही वर्षी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून ९३.७३ टक्के मुली तर ८९.१४ टक्के मुलांचा निकाल लागला आहे. मुलांपेक्षा ४.५९ टक्के मुली जास्त पास झाल्या आहेत.

 

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे.
तर कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (HSC Online Result)

 

 

 

Web Title :  Maharashtra HSC Result 2023 | 12th result 9125 percent more than 12 lakh students from the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा